लोहार समाजातील विविध मागण्यांबाबत दादा कळसाईत यांचे आमरण उपोषण

माढा (प्रतिनिधी) : विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दादा कळसाईत यांनी लोहार समाजातील विविध मागण्यांसाठी माढा तालुक्यातील टाकळी टे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर उपोषणास ओबीसी भोजन आघाडीचे अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार भटके विमुक्त समाजाचे नेते एडवोकेट अविनाश काले सहभागी झाले.
सदर आंदोलनाच्या मागण्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर लोहार आर्थिक विकास महामंडळास निकष व लोहार आर्थिक विकास मंडळास आर्थिक निधी उपलब्ध करावा, लोहार समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला गावामध्ये दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, लहुजी लोहार व भीमा लोहार यांचे स्मारक बांधावे, लोहार समाज लागणारे साहित्य पंचायत समिती द्वारे मोफत मिळावे व इतर काही मागण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे.

यावेळी पाच दिवसानंतर हि शासनाने दखल न घेतल्यामुळे यशवंत कळसाइत या युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला