नाद शेअर मार्केटचा… फसवणूक 91 लाखांची… अकलूज पोलिसांकडून एक अटकेत

अकलूज (प्रतिनिधी )शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा तुम्हाला 10%नफा मिळेल. असे आमिष दाखवून तब्बल 91लाख रुपये ची फसवणूक केली असल्याची तक्रार आकाश अधिकराव मुंजाळ (वय 36 वर्षे )धंदा व्यवसाय रा- कृष्णप्रिया नगर यशवंत नगर ता- माळशिरस जि-सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकलूज पोलीस ठाणे येथे गेल्या वर्षी दाखल करण्यात आली होती.दरम्यान या प्रकरणी अकलूज पोलिसांनी 11फेब्रुवारी रोजी यातील आरोपी रुपेश पवार याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोज चंद्रकांत पवार व रूपेश चंद्रकांत पवार दोघे रा- रत्नपुरी 5, संग्राम नगर ता- माळशिरस यांनी संगणमत करुन, “तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला एक वर्षानंतर दरमहा तुम्ही गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के नफा मिळेल” असा विश्वास देवून गुंतवणूक करण्यास लावून दिनांक 28/10/2021 ते दिनांक 10/05/2023 या कालावधीत रोख स्वरूपात व आर-टी-जी एस मार्फत वेळावेळी वेगवेगळे बँक खात्यामध्ये रक्कम 91,00,000/- रुपये पाठविन्यास सांगून त्याचा नफाही व मुद्दलही दिली नाही म्हणून त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याबद्दल आकाश मुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलुज पोलीस ठाणे येथे भा-द-वि-सं-क- 406, 420, 34 प्रमाणे गुना दाखल करण्यात आला होता.पुढील तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शन खाली सुरु आहे.