Uncategorized
हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपुरी दर्गाहचे संस्थापक विश्वस्त, ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान कमाल इमाम जमादार यांचे निधन

लुमेवाडी येथील ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान कमाल इमाम जमादार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कमाल जमादार हे लुमेवाडी गावचे पंचवीस वर्षे सरपंच पदावर होते. हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे संस्थापक विश्वस्त होते. ऑल इंडिया चॅम्पियन तसेच अनेकदा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान म्हणून त्यांचा नावलौकिक राहीलेला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक होते. निरा भिमा साखर कारखान्याच्या संचालीका जबीन जमादार यांचे पती तर माजी ग्रामपंचायत सदस्य, कुस्ती कोच सद्दाम जमादार व महाराष्ट्र पोलीस हैदर जमादार यांचे ते वडील होते.