Uncategorized

प्रयागराजच्या महाकुंभात अग्नितांडव!

प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात (MahaKumbh 2025) आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-१९ कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तंबूत जेवण तयार होत असताना ही आग आल्याची प्राथमिक माहिती आली आहे. आग लागल्यानंतर अनेकदा सिलेंडरचे ब्लास्ट झाले. त्यानंतर 20 ते 25 तंबूंना आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

महाकुंभमेळ्यात गोंधळाचे वातावरणआकाशात धुराचे लोट उठत असल्याचे पाहून संपूर्ण महाकुंभमेळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर साधू संतांनी आश्रम रिकामे केले अन् सुरक्षित स्थानी धाव घेतली. अग्निशमन दलच्या गाड्या तातडीने पोहोचल्या असून भाविकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे.अधिकाऱ्यांनी दिली माहितीअखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचवेळी, या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, जो ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी वरून रेकॉर्ड केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!