महाराष्ट्र
बारामती कृषी प्रदर्शनात सर्व फळांची आईस्क्रीम व बर्फी, मोहोळ येथील राजेंद्र आतकरे शेतकऱ्याचा उपक्रम

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. हे कृषी प्रदर्शन दरम्यान शेतकऱ्यांसाठी खुल असणार आहे. कृषी प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळांची लागवड करून ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादन काढून त्यापासून अनोखा उपक्रम केलेला आहे. या उपक्रमांमध्ये फळांपासून बर्फी आणि आईस्क्रीम च एक नवीन उत्पादन निर्माण केले आहे. कृषी प्रदर्शनात या बर्फी आणि आईस्क्रीम ला मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन पाहण्यास आलेले शेतकरी भेट देत आहेत.
